राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे गंभीर आरोप त्यांनी नवाब मलिक यांच्यावर केले आहेत. मात्र, असं करताना त्यांनी २०१०मध्ये राज्याचे गृहमत्री आर. आर. पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर देखील खुलासा केला आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांचे दाऊद गँगचा सदस्य सलीम पटेल याच्यासोबतचे व्हिडीओ आणि फोटो तेव्हा व्हायरल झाले होते. त्यावरून आर. आर. पाटील यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचे देखील आरोप झाले. मात्र, आता त्याय प्रकरणाशी आर. आर. पाटील यांचा संबंध नसल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे सलीम पटेल?

सलीम पटेल हा दाऊद गँगचा सदस्य आहे. तो दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडिगार्ड, ड्रायव्हर आणि फ्रंटमॅन देखील होता. हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेलला देखील अटक झाली. हसीना पारकरच्या नावे सलीम पटेलच खंडणीचे व्यवहार करायचा असं सांगितलं जातं. २०१०मध्ये एका कार्यक्रमाला आर. आर. पाटील गेले असताना तिथे सलीम पटेल देखील उपस्थित असल्यामुळे त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते.

Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब

काय झालं होतं तेव्हा?

२०१०च्या सप्टेंबर महिन्यात राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील ईदनिमित्त अल्पसंख्याक आयुक्त नसीम सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी ईदच्या पार्टीाठी सलीम पटेल आणि मुबीन कुरेश देखील होता. यावेळी पाटील यांचे सलीम पटेल आणि मुबीन कुरेशीसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून आर. आर. पाटील यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे आरोप देखील झाले होते.

“अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग”; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप, पत्रकार परिषदेत दिले पुरावे!

पाटील यांचा काहीही संबंध नव्हता – फडणवीस

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आर. आर. पाटील यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा फडणवीसांनी केला आहे. “मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील एका इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा या गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यात त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on r r patil meeting with salim patel photo viral iftaar party pmw
First published on: 09-11-2021 at 14:25 IST