Devendra Fadnavis : आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) प्रतिआव्हान देत उत्तर दिलं आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काय कलगीतुरा रंगला? चला जाणून घेऊ.

उद्धव ठाकरेंनी भाषणात काय म्हटलं होतं?

मी ठरवलं आहे प्रत्येक सभेत सांगतो आहे. तुमच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवाजी महाराज आमचे देव आणि दैवत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय शांत बसणार नाही. सूरतेत मंदिर बांधणार हे आकसाने नाही. इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी लुटली होती. तिथे गद्दार पळाले होते. पुन्हा कुणी गद्दार सुरतेला जाता कामा नये म्हणून मी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार आहे. कारण इथेही महाराज आहेत आणि तिथेही महाराज आहेत. असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आमचे उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. आल्यानंतर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांवर इंग्रजांवर राग होता. अरे तुम्हाला आता औरंगजेबाचं नाव घ्यायची लाज वाटू लागली? मतांसाठी इतकं लांगूलचालन? बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचं हिंदूहृदय सम्राट हे पदही काढून टाकलं. काही ठिकाणी तर त्यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं गेलं. उद्धवजी या भारतातला जो राष्ट्रवादी मुस्लिम आहे तोदेखील औरंगजेबाला आपला नेता मानत नाही. पण तुम्ही औरंगजेबाचं नाव घ्यायाला का लाजता? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केली आणि औरंगजेबाला सांगितलं की माझ्या स्वराज्याचा खजिना माझा आहे. त्यानंतर तो खजिना उभा करण्याचं काम शिवरायांनी केलं. आज त्याची लाज त्यांना वाटते आहे. उद्धव ठाकरे म्हणाले सुरतेला जाऊन महाराजांचं मंदिर बांधणार. २२ वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उभारला आहे. आता माझी उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे. तुम्ही म्हणता सगळीकडे मी छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारणार, चला तर मग आपण मुंब्र्याला शिवाजी महाराजांचं मंदिर उभारु, तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वा पहिलं मंदिर तिथे उभारु आणि छत्रपती शिवरायांना नमन करु.” असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ( Devendra Fadnavis ) प्रतिआव्हान दिलं आहे.

हे पण वाचा- “राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”, देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले संजय राऊत?

“आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं जाईल त्याची तुम्ही चेष्टा करत आहात? तुमच्या मनात छत्रपती शिवरायांबाबत इतका द्वेष का? कारण तुमचं प्रेम छत्रपती शिवरायांवर नाही तर तुमचं प्रेम गुजरातवर आहे. त्या काळात शिवरायांनी जी सुरत लुटली त्या सुरतवर तुमचं प्रेम आहे. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात. त्याचं काय झालं? तुमच्या या चेष्टेखोर स्वभावामुळे ते स्मारक होऊ शकलं नाही. आम्ही सांगाल तिथे मंदिर बांधून देतो. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा, त्यांच्या कार्याचा द्वेष्टा आहे ते पुन्हा स्पष्ट झालं आहे. आम्हाला आव्हान देता काय मुंब्र्यात मंदिर उभारा, आम्ही पाकिस्तानात मंदिर बांधून दाखवू शकतो.” असं संजय राऊत म्हणाले.