परळी विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण भाऊ शाब्दिक युद्ध रंगले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगावरून खासदार प्रीतम मुंडे यांना टोला लगावला. २००९ मध्ये जर मला निवडणूक लढवू दिली असती तर मतदारसंघ १५ वर्षांत पुढे गेला असता असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंनाही टोमणा मारला आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
काशी विश्वनाथाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे देखील आहे. खासदारांना हे माहित हवं होतं. तर शिरसाळा येथील एमआयडीसी वरून बहिण पंकजांवर देखील धनंजय मुंडे यांनी टीका केली. मी आणलेल्या एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल. असं आवाहन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे दिले आहे. २००९ ची विधानसभा निवडणूक मला लढवून दिली असती तर आज मतदारसंघ पंधरा वर्षे पुढे विकासात गेला असता असे देखील धनंजय मुंडे म्हटलं आहे.यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं.
धनंजय मुंडे यांचं पंकजा मुंडेंना आव्हान
पुढे धनंजय मुंडे म्हणाले, राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग तुम्ही सिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवाच असं आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना दिलं आहे. वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शेरमेची बाब असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना जोरदार टोला लगावला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली त्यावरूनहीधनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. देशात लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.