Diwali 2025 Green Crackers : उशीरा झालेली फटाक्यांची चाचणी, त्यातील रासायनिक घटकांच्या अचूक पडताळणीचा अभाव यांमुळे दिवाळीच्यापहिल्याच दिवशी शहरांचा श्वास कोंडला आहे.  गेल्या काही वर्षांपासून गवगवा झालेले हरित फटाके हे प्रदूषण काही अंशी कमी करत असले तरी ते पूर्णपणे सुरक्षित किंवा प्रदूषण विरहीत नाहीत. त्यातही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करण्यापूर्वीच फटाकेबाजारात दाखल होऊन त्याची मोठ्या प्रमाणात विक्रीही झाली आहे.

Green Crackers : हरित फटाके काठावर पास…

हरित फटाके म्हणजे पूर्णपणे प्रदूषण विरहित असा समज रूढ झाला आहे.मात्र, प्रत्यक्षात हरित म्हणून ओळखले जाणारे फटाकेही प्रदूषणात भर घालणारेच आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हरित फटाके साधारण फटक्यांच्या तुलनेत हवेत मिसळणाऱ्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी करतात. मात्र, अनेक घातक वायूहरित फटाक्यांतूनही हवेत मिसळतात.एकत्र, मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात तेव्हा हवेचा दर्जा हमखास ढासळतो.

यंदाही हरित फटाके असल्याचा दावा करणाऱ्या फटाक्यांमध्ये पोटॅशिअम नायट्रेट, सल्फर, अल्युमिनियम हे सर्व  आहे. नीरी या संस्थेने घातलेल्या मर्यादेत हे सर्व घटक असल्याचा दावा आणि अनुषंगानेनोंदी उत्पादकांनी केल्या आहेत.त्यानुसार पोटॅशियन नायट्रेटचे प्रमाण हे ५५ टक्क्यांपर्यंत, सल्फर १५ ते २३टक्क्यांपर्यंत तर अल्युमिनियम २० ते २५टक्क्यांपर्यंत आहे. अनेक उत्पादकांच्याफटाक्यांमधील पोटॅशियम नायट्रेटचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याचेही दिसते आहे.बेरियम क्षारांच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही अनेक फटाक्यांमध्येअजूनही त्याचा वापर होत असल्याचेदिसते.

Green Crackers : उशीरा चाचण्या, जागृतीचा अभाव

वाढते प्रदूषण आणि त्यात फटाकेघालत असलेली भर या पार्श्वभूमीवर२०१८ मध्ये जगण्याचा, आरोग्याचा, स्वच्छ हवेचा हक्का हा मुद्दा केंद्रस्थानीठेवून न्यायालयात याचिका दाखलझाली. तिच्या सुनावणीदरम्यान हरित फटाक्यांचा मुद्दा अधिक चर्चेत आला.त्याचा गवगवा वाढला तसा हरित फटाके म्हणजे प्रदूषके विरहित फटाकेअसा समज वाढला. हरित फटाकेम्हणजेच तुलनेने कमी हानीकारकफटाक्यांचा बाजारपेठेतील, अर्थकारणातील वाटा वाढू लागला. मात्र तरीही सध्या ७० हजार ते ८० हजार टन पारंपरिक फटाके बाजारात विकले जात असल्याचे विविध अहवालांवरून दिसते.हरित फटाक्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचाकल वाढत आहे. मात्र, अनेक कंपन्याअजूनही वेष्टनावर क्यू आर कोड छापणे, घटकांचे प्रमाण छापणे असेनियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळेहरित फटाके घ्यायचे असले तरी ते ओळखायचे कसे याबाबत फारशी जागृती नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्याआदेशानंतर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी फटाक्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली. चाचणीत निकषांमध्ये न बसणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादकांवर कारवाई करणे, असे फटाके ग्राहकांपर्यंत पोहचू नयेत यासाठी त्यांच्यावर बंदी घालणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात दिवाळी तोंडावर असताना, बाजारपेठेत फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर फटाक्यांच्या चाचण्याकेल्या जातात. त्याचाही भर आवाजाचीपातळी किती हे तपासण्यावर अधिक असतो. फटाक्यांतील रासायनिक घटक उत्पादकांनी केलेल्या दाव्यानुसार आहेतका याची पडताळणी फारशी होत नसल्याचे पडताळणी अहवालांवरूनदिसते. त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे एका माजी अधिकाऱयांनीसांगितले.

Green Crackers : तरीही दणदणाट…

तुलनेने ध्वनी प्रदूषणाबाबत जागृतीवाढत असल्याचे दिसते. मोठ्याआवाजाच्या फटाक्यांपेक्षा शोभेचेफटाके खरेदी करण्याकडे ग्राहकांचाकल वाढला आहे. तसेच फटाक्यांच्याचाचण्या या प्रामुख्याने आवाजाच्यापातळीच्या होत असल्यानेउत्पादकांकडून आवाजाच्या मर्यादेचेपालन होत असल्याचे दिसते आहे.साधारण ६० ते ९० डेसिबल दरम्यान फटाक्यांच्या आवाजाची पातळी आहे.असे असले तरीही एकाचवेळी एकदम सगळीकडे वाजणाऱया फटाक्यांमुळेध्वनी प्रदूषण टळलेले नाही. गेली तीन वर्षे मुंबईतील अनेक भागांतलक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवाजाचीपातळी ही सरासरी १०० ते १२० डेसिबल दरम्यान होती

Green Crackers : फटाके पूर्ण बंद होतील का?

प्रदूषण टाळायचे असल्यास फटाक्यांवरबंदी हाच रास्त मार्ग असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. प्रत्यक्षात मात्र अशी बंदी येण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. बाजारपेठेचा आढावाघेणाऱया विविध संस्थांच्याअहवालानुसार भारतातील फटाक्यांचीउलाढाल ही ६ हजार कोटी रुपयांच्याघरात आहे. त्यात दरवर्षी साधारण ६ टक्क्यांनी वाढ होते. फटाक्यांचेजवळपास ८ हजार नोंद असलेलेकारखाने आहेत.