सावंतवाडी: आज मंगळवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस हुरमाळे येथील टाटा मोटर्स शोरूमसमोर भीषण अपघात झाला. या दुहेरी अपघातात एका डंपरखाली चिरडून मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांची नावे अनुष्का अनिल माळवे (वय १८, राहणार – अणाव दाबाची वाडी) आणि विनायक मोहन निळेकर (वय २२, राहणार – राणबांबुळी) अशी आहेत.

या अपघातात इनोव्हा कारमधील आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये टाटा मोटर्स शोरूममधील सुरक्षा रक्षक रोहित कुडाळकर यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स शोरूमसमोर इनोव्हा कार, मोटरसायकल आणि डंपर यांच्यात सकाळी ८ च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताची अधिक तपासणी सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत.