सांगली : महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केली असून त्यांच्या शिवसेना प्रवेशाने महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेले काही दिवसापासून सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असताना काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सांगलीत कोणत्याही स्थितीत काँग्रेसच निवडणूक लढविणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार म्हणून सामोरे जाऊन खासदार होतील असा विश्‍वास शनिवारीच व्यक्त केला होता.

pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Former MLA-activist abused each other in front of Congress National Secretary in Dhule
धुळ्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांसमोर माजी आमदार-कार्यकर्त्यांत शिवीगाळ
Four former corporators from Ajit Pawars NCP warn that Mahavikas Aghadi option remains open
चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा भाजपचे…’ अजितदादांच्या माजी नगरसेवकांचा इशारा
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट

हेही वाचा…गरिबांची खिचडी खाणाऱ्याला उमेदवारी का? उबाठा गटाकडून अमोल किर्तीकरांचे नाव जाहीर होताच काँग्रेसची टीका

गेल्या एक वर्षापासून पैलवान लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करत असून या निमित्ताने त्यांनी सहाही विधानसभा मतदार संघामध्ये बैलगाडी शर्यती, कुस्ती स्पर्धा आणि रक्तदान शिबीराच्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून सांगलीची जागा शिवसेना लढविणार या चर्चेनंतर त्यांनी शिवसेनेशी संपर्क वाढवला होता. सोमवारी ते मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधणार असून या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे, अनिल देसाई, संजय राउत ही सेनेची दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील यांच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्ते आज मुंबईला रवाना झाले आहेत.