राज्यातील ड्राय डेची संख्या कमी होणार असून यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. सध्या राज्यात सणानुसार प्रत्येक शहरात ड्राय डे जाहीर करण्यात येतो. समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ड्राय डेचे धोरण समान असेल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जिल्हानिहाय ड्राय डे जाहीर केला जातो. जिल्ह्यातील सण-उत्सवानुसार ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. “काही ठिकाणी ड्राय डेच्या नावाखाली गरज नसतानाही मद्याची दुकाने बंद केली जातात. राज्यातील ड्राय डे धोरणासंदर्भात सुस्पष्टता आणि सुसूत्रता आणावी यासाठी सरकारने समिती नियुक्त केली आहे”, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ड्राय डेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे जे अधिकार आहेत त्याऐवजी संपूर्ण राज्यात ड्राय डेचे समान धोरण कसे राबवता येईल, यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

नागपूर विमानतळावर बावनकुळे बोलत होते. दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांचे शनिवारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ विमानतळावर घोषणा देखील देण्यात आल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry day in maharashtra excise minister chandrashekhar bawankule committee formed
First published on: 01-06-2019 at 10:54 IST