मुंबई – गोवा महामार्गापासून दुरशेत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी आज पेण तालुक्यातील दुरशेत गावातील ग्रामस्थांनी नदीत उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात दुरशेत गावातील शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, शाळेतील विद्यार्थी व जेष्ठ मंडळी सहभागी झाली होती.

ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरून जलआंदोलन केले. यावेळी पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत येत्या २२ तारखेला मंगळवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले.

या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, सूरज भोईर, नितेश डंगर, वैशाली पाटील, प्रसाद भोईर, संतोष ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ महिला, विद्यार्थी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुरशेत गावाच्या वरील बाजूस असलेल्या अनेक दगड खाणींच्या आहेत..या खाणीमधून दररोज चालणाऱ्या ३०० ते ३५० ओव्हरलोड गाड्यां ये जा करत असतात. ज्यामुळे रस्ता खराब होतो. रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,गौण खनिज प्लॅन्ट मुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरातील खाणकाम बंद करावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या १७ जून रोजी याच मागण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. पण जी आश्वासने दिली त्यावेळी दिली होती त्याची महिन्याभरात कोणतीही पूर्तता नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा हे आंदोलन केले.

नदीपात्रात उद्या मारल्या. त्यानंतर पेण चे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच २२ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर आंदोलना प्रसंगी प्रशासनाच्या वतीने विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणेसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा हजर होता. तर जल आंदोलन असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पालिकेचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापनातील बोट तैनात ठेवण्यात आली होती.