Earthquake Marathwada Updates छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात आज सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याचे सांगण्यात आले. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आले होते.

भूकंपाची खोली १० किलोमीटरच्या परिसरात असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा दुसराही ३.६ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलिकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येते. या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून धक्का जाणवताक्षणी अनेकजण घराच्या बाहेर पडले. काही जुन्या घरांना तडे गेल्याचेही सांगण्यात येत आहे. कोणत्या गावात नुकसान झाले आहे का, याची माहिती एकत्रित केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाची तीव्रता जाणवल्याचे सांगण्यात आले.

amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..

हेही वाचा…शिवसेना २०, काँग्रेस १८, राष्ट्रवादी १० जागा लढणार? महाविकास आघाडीच्या बैठकीत आज निर्णय

हिंगोली जिल्हयातील सर्वच जवळ ७१० गावांमध्ये गुरुवारी (ता. २१) पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपचा धक्का बसला आहे. ४.५ रिश्‍टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची ३.६ एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

२१ मार्च रोजी सकाळी ०६:०८:३० वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. हिंगोली वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर होती.

हेही वाचा…Petrol Diesel Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

लगेचच दुसरा हलका धक्का अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ०६:१९:०५ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन हादरे बसत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांनाही नित्याच्या झाल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत.

हेही वाचा…Electoral Bonds : “आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं जातं, निवडणूक रोख्यांमधले..”, ओवैसी यांचं महत्त्वाचं वक्तव्य

दरम्यान, आज पहाटे सहा वाजून आठ मिनीटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच ७१० गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.

दरम्यान, आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी सहा वाजून आठ मिनिटांचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचे गावकरी केशव मुळे यांनी सांगितले. तर पिंपळदरी परिसरातील आता पर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितले. तर यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

हेही वाचा…“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”

प्रशासनाकडून ४.५ ची नोंद असल्याची माहिती

जिल्हयात झालेल्या या भूकंपाची ४.५ रिश्‍टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली १० किलोमीटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा धक्का ६ वाजून १० मिनीटांनी बसला असून त्याची ३.६ रिश्‍टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.