भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed action against eknath khadse assets confiscated money laundering case abn
First published on: 27-08-2021 at 10:55 IST