राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या कंपनीने मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून एक प्लॅट देण्यात आला होता. हा प्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, इकबाल फरारी होता आणि त्याचा २०१३मध्ये लंडनमध्ये मृत्यू झाला होता. पटेल यांच्या कुटुंबाने प्रमोट केलेली कंपनी आणि मिर्ची या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इकबाल मेमन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेट कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्राव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी ईडी करत आहे.

गेल्या दोन आठवड्यात ईडीने मुंबई आणि बेंगळुरूमध्ये ११ ठिकाणी छापे टाकले आहेत. छाप्यात मिळालेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. छाप्यात कागदपत्रांसोबत डिजीटल पुरावे, ई-मेलचा देखील समावेश आहे. यासाठी ईडीने १८ लोकांची साक्ष देखील नोंदवण्यात आली आहे. संबंधित जागा पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या कंपनीच्या नावावर होण्याआधी ती जागा इकबाल मेमनची पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होती, असा महत्त्वाचा पुरावा ईडीला मिळाला आहे. याच जागेच्या पुनर्निर्मितीसंदर्भात दोघांमध्ये करार झाला होता.

या कराराची कागदपत्रे देखील मिळाली आहेत. २००६-०७मध्ये हा करार झाला होता. या करारानुसार सीजे हाऊसमध्ये दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आली होती. या दोन मजल्यांची किमत २०० कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत भागधारक आहेत.