जालना : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबंधित जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शुक्रवारी छापे टाकले. जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच खोतकर यांना लक्ष्य केले होते.

खोतकर यांच्या निवासस्थानी सकाळीच ईडीचे पथक पोहोचले. तसेच खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जाऊनही या पथकाने तपासणी केली. जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी- विक्री व्यवहाराशी संबंधित औरंगाबाद येथील दोन उद्योग व्यावसायिकांवर सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. त्याअनुषंगाने किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर आर्थिक घोटाळय़ांचे आरोप केले होते. बँकेकडे गहाण नसलेल्या शंभर एकर जमिनीचीही विक्री झाल्याचा आरोप करून खरेदी विक्रीच्या व्यवहारात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

हा कारखाना अर्जून खोतकर यांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना कागदोपत्री विक्री करण्यात आला. पण त्यासाठी देण्यात आलेली रक्कम अर्जून शुगर्समधून देण्यात आली होती. जुगलकिशोर तापडिया यांनी त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसे मान्य केले आहे. १९८४ मध्ये जालना कारखाना उभारण्यात आला होता. दहा हजार सभासद असणार्या या कारखान्याची मोठी जमीन असल्याने त्याच्या विक्रीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जात होता. लातूर येथील कॉ.माणिकराव जाधव यांनी या प्रकरणात पहिली तक्रार केली होती.

अण्णा हजारे, मेधा पाटककर यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. पण अलिकडेच हे प्रकरण भाजपने उचलले आहे. या अनुषंगाने तापडिया आणि त्यानंतर पद्माकर मुळे यांनी हा कारखाना खरेदी केला. त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी आता अंमलबजावणी संचालनालयाकडून केली जात आहे.

त्यानंतर खोतकर यांनी सोमय्यांचे आरोप बेछूट आणि पुराव्यांशिवाय असल्याचा खुलासा केला होता. मूल्यांकन करणारांशी संगनमत करून कारखान्याच्या जमिनीची आरक्षित किंमत केल्याच्या सोमय्या यांच्या आरोपाचा खोतकर यांनी इन्कार करून शासनाची बँकेकडे गहाण असलेली जमीन हडप केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते. सोमय्या यांचा बोलविता धनी वेगळाच असून यामागे राजकारण अ्सल्याचे खोतकर यांनी म्हटले होते.

आरोप काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य बॅंकेने कारखान्याची जप्ती केली तेव्हा कर्ज नऊ कोटी आणि व्याज ३३ कोटी रुपये होते. कारखाना कमी किंमतीत विक्री करताना घोटाळा करण्यात आला. त्याची तपासणी केली जात आता केली जात आहेत.