शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब

आणखी वाचा- रिक्षाचालक ते सव्वाशे कोटींचा मालक… प्रताप सरनाईक यांचा थक्क करणारा प्रवास

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

कंगना रणौत प्रकरणातही प्रताप सरनाईक यांनी आक्रमकपणे भूमिक मांडली होती. कंगना रणौतने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली होती.