शिंदे गटातील नेते व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संतापल्याचं पाहायला मिळालं. शिक्षण संस्था चालकांच्या अधिवेशनात काही संस्था चालकांनी पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर दीपक केसरकरांनी “तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलावलं आहे, तर पाहुण्याचा आदर ठेवायला शिका,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते रविवारी (२ ऑक्टोबर) सांगलीत बोलत होते.
सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात संस्था चालकांनी आक्रमक होत पवित्र पोर्टल रद्द करण्याची मागणी. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित संस्था चालकांना धारेवर धरलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच दीपक केसरकरांनी संस्था चालकांवर ताशेरे ओढले. पवित्र पोर्टल भरतीवरून शिक्षण संस्था चालकांनी, शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू असताना पवित्र पोर्टल रद्द करा, अशा घोषणा दिल्या होत्या.
यानंतर संतप्त दीपक केसरकरांनी संस्थाचालकांची भाषणामध्येच खरडपट्टी केली. केसरकर यांनी सुप्रिया सुळे यांनी विषय मांडला म्हणून मी बोलतोय, असं सांगितलं. तसेच पवित्र पोर्टल रद्द करायला मी येथे आलो नाही, असं नमूद केलं. “
व्हिडीओ पाहा :
“तुम्ही पाहुणा म्हणून बोलावले आणि मी पाहूणा म्हणून आलो आहे. त्यामुळे पाहुण्यांचा आदर ठेवायला आधी शिकले पाहिजे,” अशा शब्दात मंत्री केसरकरांनी शिक्षणसंस्था चालकांना सुप्रिया सुळेंसमोर खडेबोल सुनावले. पोर्टलमध्ये त्रुटी असतील तर सांगा, पण पोर्टल रद्द करा म्हणून कार्यक्रमात तुम्ही बोलणार असाल, तर पोर्टल अजिबात रद्द केले जाणार नाही,” असंही केसरकरांनी म्हटलं.
“…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालेल्या धमकीवर दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका असं नेहमी सांगतो. कारण असं ज्या ज्या लोकांनी केलं आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कारणामुळे आपण दोन पंतप्रधानांना गमावले आहे.”
हेही वाचा : “…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकप्रिय आहेत. मात्र, त्यांना सुरक्षेबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घेतली नाही, तर त्यांचे महाराष्ट्र सुखी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. हे मी गृहखात्याचा माजी गृहराज्यमंत्री म्हणून सांगु शकतो.