शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांच्या शिकवणीचा विजय आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दिल्लीतून विनंती अन् फडणवीसांचा होकार; अगदी अंतीमक्षणी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय

“हा बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिवकणीचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल. सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणार आहेत. राज्याच्या विकासाचा गाडा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> Eknath Shinde New Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री!

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याआधी मी या सरकारचा भाग नसेन. मात्र हे सरकार सुरळीत चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विनंती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde first comment after taking oath as maharashtra cm said will work for development prd
First published on: 30-06-2022 at 20:09 IST