गेल्या पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची रत्नागिरीत प्रमोद महाजन संकुलात सभा पार पडली. यावेळी शिंदे गटात अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला. तेव्हा एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे.

“बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची भूमिका आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजपा युती म्हणून आपण एकत्र निवडणुका लढवल्या. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून मतं मागितली. लोकांनी पूर्ण बहुमत युतीला दिलं. त्यामुळे लोकांच्या मनातलं आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं. मग, काय चुकलं आमचं,” असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं…”

“आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्याला आम्ही कामातून उत्तर देऊ. पण, ज्यांना खोके माहिती आहेत, तेच खोक्याची भाषा करतात. खोके कुठून कुठे जातात हे सर्वांना माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. ५० खोके नाहीतर ७५० खोके आम्ही रत्नागिरीच्या विकासासाठी दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत. आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत,” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

हेही वाचा : “भाजपाकडून भुंकण्यासाठी श्वानपथक नियुक्त, त्याचा रिमोट…”, उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीची टीका; बोम्मईंचाही घेतला समाचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीकडून उद्या ( १७ डिसेंबर ) मुंबईत महाविराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरूनही एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे. “आपण धडाकेबाज निर्णय घेत आहोत. पण, जे रस्त्यावर येत आहेत, ते मोर्चा काढतील. आपण काम करणारे आहोत, काम करणाऱ्यांचीच चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चा काढतात,” असं एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले.