लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विलासराव देशमुख सहकारी पॅनेलच्या १९पकी १३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. आता केवळ ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधारी पक्षासमोर अक्षरश: नांगी टाकली.
विलासराव देशमुख सहकारी पॅनेलचे आमदार दिलीपराव देशमुख, शिवकन्या िपपळे, स्वयंप्रभा पाटील, संभाजी सूळ, नाथसिंह देशमुख, एस. आर. देशमुख, प्रमोद जाधव व पृथ्वीराज शिरसाठ हे ८ उमेदवार पूर्वीच बिनविरोध निवडले गेले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी औसा मतदारसंघातून अ‍ॅड. श्रीपती काकडे, निलंगा मतदारसंघातून अशोक पाटील निलंगेकर, उदगीरमधून माजी आमदार चंद्रशेखर भोसले, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सुदाम रुकमे व मत्स्य, गृहनिर्माणमधून विश्वंभर माने हे पाच उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
अहमदपूरमधून आमदार विनायक पाटील यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी अहमदपूरमध्ये माजी आमदार बाबासाहेब पाटील व आबासाहेब किशनराव देशमुख या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे. देवणीमधून भगवानराव पाटील तळेगावकर व भगवान पाटील विजयनगरकर या दोघांचे भाग्य ठरणार आहे. चाकूरमधून विठ्ठल माकणे यांनी माघार घेतल्यानंतर एन. आर. पाटील, शिवाजी काळे व प्रदीप जाधव असा तिरंगी सामना रंगणार आहे. जळकोटमधून शीला पाटील व ओम देवशेट्टे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. शिरूर अनंतपाळ मतदारसंघात व्यंकट बिरादार यांच्याविरोधात लक्ष्मण बोधले यांनी बंडखोरी केली. पतसंस्था मतदारसंघात श्रीशैल्य उटगे यांच्या माघारीनंतर रमेश कराड व अशोक गोिवदपूरकर यांच्यात पारंपरिक लढत होणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elction of latur district bank
First published on: 25-04-2015 at 01:40 IST