महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरं गेलेलं नाही. याबद्दल देशमुख यांचे वकील घुमरे यांनी सांगितलं की, ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्हाला जे काही हवं आहे ते सांगा आम्ही देऊ. तसंच सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे जर सगळं ऑनलाईन सुरु आहे तर चौकशीही ऑनलाईन माध्यमातून घ्या अशी आम्ही मागणी केली आहे.

हेही वाचा-अनिल देशमुख यांना पुन्हा ED चं समन्स; यावेळी त्यांच्या मुलाचंही नाव!

भुमरे म्हणाले, अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांची चौकशी ऑनलाईन माध्यमातून व्हावी. अशी कोणती गोष्ट आहे की जी समोर बसूनच तुम्हाला मिळणार आहे? देशमुख तुमच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. ही चौकशी ऑनलाईन माध्यमातून व्हावी, अशी मागणी आम्ही ईडीकडे करत आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate summons wife of anil deshmukh former home minister of maharashtra vsk
First published on: 14-07-2021 at 16:49 IST