लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपने रायगडच्या जागेवर दावा सांगितल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ते आता दूर झाले आहे.

ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन

सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच यासाठी पक्ष आग्रही होता. मात्र भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. माजी आमदार धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीने पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षात पक्षात तणाव निर्माण झाला होता. भाजपचे नेते तटकरेंविरोधात कमालीचे आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये रायगडच्या जागेवरून वाद पेटला असतांनाच, शिवसेनेच्या विकास गोगावले यांना उमेदवारी द्या असे बॅनर समाज माध्यमांवर झळकले होते. त्यामुळे रायगडच्या जागेचा तिढा अधिकच वाढला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह युतीतील घटक पक्षात संभ्रमाचे वातावरण होते.

आणखी वाचा-लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी

मात्र अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरे हेच महायुतीचे रायगडचे उमेदवार असतील अशी घोषणा केली, आणि रायगडच्या जागेवरून असलेला तिढा सुटल्याचे जाहीर केले. तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तटकरे यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

आणखी वाचा- सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..”

रायगडच्या जागेवरून सुरू असलेला वाद आज संपला आहे. येत्या काळात महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आता एक दिलाने कामाला लागलेले पहायला मिळतील. -मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड

राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक दिवस आम्ही या घोषणेची वाट पाहत होतो. आज ती झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातून तटकरे साहेबांना पुन्हा एकदा दिल्ली पाठवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू. -अमित नाईक, संघटक, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ