खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज(शनिवार) खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या अटकेच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक” असं फडणवीसांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला केला आहे.

याचबरोबर, “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?” अशा शब्दांमध्ये फडणवीसांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.

राणा दाम्पत्यास अटक; आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार!

तर, अटक करण्यात आल्यानंतर आज किंवा उद्या न्यायालयात हजर करण्या अगोदर राणा दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे देखील समोर आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis targets thackeray government over rana couples arrest msr
First published on: 23-04-2022 at 19:01 IST