इंग्लंडच्या बनावट नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सांगलीच्या कत्तलखाना परिसरात रविवारी आढळून आल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. अर्धवट जळालेल्या या नोटा एकाच क्रमांकाच्या असल्याने बनावट असल्याचे सिद्ध होत असले तरी त्यांचा खरेपणा तपासण्यासाठी नाशिकला धाडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
आज सकाळी कत्तलखाना परिसरात एका व्यक्तीला ५० पौंडच्या बँक ऑफ इंग्लंडच्या आणि राणीचे चित्र असलेल्या नोटा सापडल्या. हे परकीय चलन बाजारात आणण्याच्या दृष्टीने कोणी प्रयत्न करीत आहेत की काय, अशी शंका आल्याने पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
या नोटांचा खरेपणा तपासण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
सांगलीत जळालेल्या बनावट नोटा
इंग्लंडच्या बनावट नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सांगलीच्या कत्तलखाना परिसरात रविवारी आढळून आल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.
First published on: 27-07-2015 at 04:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake note burn in sangli