गेल्या चार वर्षापासून सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चित्ता (सरण) रचून  स्वतः पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  घडली  या घटनेमुळे ऐन दिवाळीत गावात शोककळा पसरली आहे असून अंधारमय वातावरण निर्माण झाले होते.
उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील पोतन्‍ना राजन्ना बलपीलवाड( वय साठ वर्ष) या शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन एका झाडाखाली लाकडाचे (सरण) चित्ता तयार केली व त्यावर बसून त्याने स्वतःला पेटवून घेतले त्यात 100% जळाला असून त्या  शेतकऱ्याचा अक्षरशा कोळसा झाला आहे या घटनेवरून तुराटी गावात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनेने गावात कोणाच्याही घरात चूल  पेटली नव्हती  हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर अतिशय दुर्गम भागात आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावाचा कसल्याच प्रकारचा विकास  झालेला नाही यामुळे खरीप  पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला सततची नापिकी सतावत आहे
आत्महत्या केलेल्या पोतन्‍ना या शेतकऱ्याकडे भारतीय स्टेट बँकेचे अडीच लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 40  हजार  आणि सेवा सहकारी सोसायटीचे 40 हजार असे एकूण तीन लाख 20 हजार  एवढे कर्ज होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer suicide by placing himself into a scam nended incident
First published on: 10-11-2018 at 19:55 IST