एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन आमदारांच्या हमरीतुमरीचा प्रकार ताजा असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा शहरातील दोन गटांत वाद झाला. शिवसेना आमदार ओम राजेिनबाळकर व राष्ट्रवादीचे कार्यकत्रे एकमेकांना भिडले. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या पद्मसिंह मुंडे-पाटील या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावरून हा तणाव निर्माण झाला.
गुरुवारी काही तरुण पद्मसिंह मुंडे यांच्या निवासस्थानी गेले. उमेदवारी का दाखल केली? मागील निवडणुकीत तू असेच केले होते, असे म्हणून त्यांना ‘आमच्या साहेबांकडे चल’ म्हणत घराबाहेर आणले. हा प्रकार सुरू असताना शिवसेनेचे आमदार राजेिनबाळकर तेथे आले. त्यांनी तरुणांना जबरदस्ती करण्यास मज्जाव केला. परंतु त्यातील एका तरुणाने राजेिनबाळकर यांच्याशी हुज्जत घातल्याने तणावात भर पडली. राजेिनबाळकर व त्या तरुणात वाद झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान, राजेिनबाळकर यांच्यासोबत असलेल्या आचारसंहिता देखरेख पथकातील एका कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार चित्रित झाला.
हुल्लडबाजीनंतर दोन्ही गटांतील तरुणांसह आमदार राजेिनबाळकर यांनी अपक्ष उमेदवार मुंडे यांच्यासह शहर पोलीस ठाणे गाठले. मुंडे पोलिसात तक्रार देत असल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी जमाव पांगवून तणावग्रस्त वातावरणावर नियंत्रण मिळविले. रात्री उशिरापर्यंत दोन्हीं बाजूंकडील तक्रारींची पोलिसांकडून शहानिशा सुरू होती. दोन्ही तक्रारींमध्ये तथ्य असेल तर गुन्हा नोंदविला जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
शिवसेना आमदार-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन आमदारांच्या हमरीतुमरीचा प्रकार ताजा असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा शहरातील दोन गटांत वाद झाला. शिवसेना आमदार ओम राजेिनबाळकर व राष्ट्रवादीचे कार्यकत्रे एकमेकांना भिडले.

First published on: 29-03-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight of shivsena mp ncp volunteer