सांगलीतील बापट मळ्यात असणा-या हरिप्रिया अपार्टमेंटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल नसल्याने नुकसानीचा अंदाज करता आलेला नाही. आगीचे कारणही अज्ञातच आहे.
हरिप्रिया अपार्टमेंटच्या तळ मजल्याला गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आगीमध्ये तळ मजल्यावर ठेवण्यात आलेल्या दोन दुचाकी हानीग्रस्त झाल्या. याशिवाय अपार्टमेंटमध्ये करण्यात आलेले विद्युत वायिरग आणि जल निस्सारनच्या पाईप्स जळून खाक झाल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2014 रोजी प्रकाशित
सांगलीत इमारतीला आग; लाखोंचे नुकसान
सांगलीतील बापट मळ्यात असणा-या हरिप्रिया अपार्टमेंटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
First published on: 25-04-2014 at 04:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to building in sangli lakhs of damage