लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाचजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उदगीर येथून कुटुंब कारने (MH 24 AB0 4080) सकाळी८.३० च्या सुमारास निघालं होतं. कारमधून सहाजण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी त्यांची नावं आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.