नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कारला गावात वीज अंगावर पडून पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. गावातील आस्वल दरिचा माळ परिसरात दुपारी ही घटना घडली. भुताळे यांच्या शेतात काम करण्यासाठी या महिला गेल्या होत्या.  पावसाला सुरुवात झाल्यामुळे या महिला लिंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबल्या होत्या. यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.  दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. रेखा मारोती पवळे, शोभा संभाजी पवळे, शोभा देविदास जाधव, मोहनाबाई गंगाधर सोनवने, शेषाबाई माधव गंगावने अशी या मृत महिलांची नावे आहेत. वीज अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.