scorecardresearch

Premium

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीवर भाजपा नेत्याची प्रतिक्रिया, घटनेचा निषेध करत म्हणाले…

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूरमध्ये चप्पलफेक करण्यात आली आहे.

Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर ? (फोटो – संग्रहित छायाचित्र)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे शनिवारी (९ डिसेंबर) ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, अजित पवार गटाचे आमदार आणि अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या मेळाव्यातून पडळकर आणि भुजबळांनी रोखठोक भाषणं केली. दोघानींही मनोज जरांगे पाटलांना घेरलं.

दरम्यान, गोपीचंद पडळकर शेजारी सुरू असलेल्या आंदोलन स्थळाला भेट देण्याकरता गेले होते. तिथं शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. यावेळी मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांकडून पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने पडळकरांना सुरक्षित स्थानी हलवलं. या संपूर्ण प्रकारावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Tejswi Yadav Home
Bihar Floor Test : आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार, पोलिसांची मध्यरात्री तेजस्वी यादवांच्या घरी धाड, बिहारमध्ये नक्की काय चाललंय?
sanjay raut on baba siddique
“मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता…”, बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या शक्यतेवरून राऊतांची टीका
hemant soren 2020
२०२० पासून हेमंत सोरेन आरोपांच्या कचाट्यात; निवडणूक आयोगानेही केली होती अपात्रतेची शिफारस

गोपींचद पडळकरांवर झालेली चप्पलफेक दुर्दैवी बाब आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पडळकरांवरील चप्पलफेकीबाबत विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, “ही एक दुर्दैवी बाब आहे. येत्या २६ जानेवारी २०२४ ला आपण संविधानाच्या सन्मानाची ७५ वर्षे पूर्ण करतोय. अशा स्थितीत वैचारिक बाबतीमध्ये एखाद्या नेत्याला विरोध करण्यासाठी अशी भूमिका घेणं, हे निंदनीय आहे.”

हेही वाचा- गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक; छगन भुजबळ संतापले, मराठा आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले…

याप्रकरणी छगन भुजबळ यांनीही एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट लिहून या घटनेचा निषेध केला आहे. पोस्टमध्ये भुजबळ म्हणाले की, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! आज विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितलं आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Footwear throw at gopichand padalkar by maratha protester in indapur sudhir mungantiwar reaction rmm

First published on: 10-12-2023 at 09:45 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×