Ashok Chavan Latest Updates: आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात हा सोहळा पार पडला. यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहोत असं म्हटलं आहे. तसंच भाजपात मी कुठल्याही पदासाठी आलो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे विकासासाठी काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपात येण्याचा निर्णय का घेतला याचंही उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.” देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगिल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना अर्ज दिला. जो भरुन त्यांना प्रवेश देण्यात आला.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे त्यांचं काम हे वाखाण्याजोगं आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला. त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात सत्ताआधारी आणि विरोधक यांचे संबंध कायमच राजकारणापलिकडे असतात. आज मी आज नवी सुरुवात करतो आहे. मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास आहे. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन वाटचाल करता आली पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून पक्षात प्रवेश केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- Ashok Chavan Join BJP : अशोक चव्हाणांना भाजपात कोणती जबाबदारी मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भाजपात येण्याचा माझा निर्णय व्यक्तिगत

“मी जिथे होतो तिथेही प्रामाणिकपणे काम केलं आहे. आजपासून भाजपात आलो आहे इथेही प्रामाणिकपणेच आणि निष्ठेने काम करणार आहे. माझा जो अनुभव आहे त्यातून भाजपाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मी पक्ष सोडल्यावर अनेक लोक विरोधात बोलत आहेत. व्यक्तिगत स्वरुपाचे दोषारोप मी कुणावर केले नाहीत आणि करणारही नाही. भाजपात येण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मला कुणीही जा सांगितलेलं नव्हतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची सबका साथ सबका विकास ही भूमिका पटल्याने मी भाजपात आलो आहे.” असंही अशोक चव्हाण म्हणाले.