सातारा : अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, आणि संस्कृतीच्या गौरवाला मान्यता मिळवणे. मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर उंची वाढवण्यात जिल्ह्याचे सुपुत्र व साहित्यिक विनोद कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.
संस्कृती प्रकाशन पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुसेगाव यांच्यावतीने सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार कुलकर्णी यांना कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, रवींद्र बेडकिहाळ, वैशालीताई फडतरे, नंदकुमार सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी आ. शिंदे म्हणाले, सतीशतात्या फडतरे यांनी सामाजिक व राजकीय काम करत असताना सर्वसामान्य जनता केंद्र मानून काम केले. तसेच खटाव तालुक्याच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे.
प्रा. जोशी म्हणाले, की विनोद कुलकर्णी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व साहित्य क्षेत्र वाढावे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. तर साहित्य चळवळीमुळे समाजाला नवी दृष्टी मिळते. लोकांना एकत्र आणता येतं आणि विचारांची देवाणघेवाण वाढते, असे मत विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक अविनाश फडतरे, सूत्रसंचालन मोहन गुरव तर आभार दिनेश फडतरे यांनी मानले. कार्यक्रमाला श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, संदीप जाधव, गणेश जाधव, प्रदीप जाधव, गुलाबराव वाघ, अकुंश पाटील, संजय चव्हाण, अमृत नलवडे, संजय जाधव, नितीन चव्हाण उपस्थित होते.