संगमनेर:आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जातीधर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले. तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर खुर्द येथे थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, पांडुरंग घुले, अर्चना बालोडे, रामनाथ कुटे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, सरपंच गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले,धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले.निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली.आता पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे.आमदारकी हे सर्व तालुका व सहकारी संस्थांना मोठे कवच होते.मात्र जनतेने ते कवच गमावले आहे.त्याचा लगेच त्रास सुरू झाला आहे. शहराजवळील गावांना आश्वीच्या अतिरिक्त तहसील कार्यालयाला जोडण्याचा डाव आहे.शहरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे.अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. आपले सुसंस्कृत राजकारण व संस्कृती टिकवण्यासाठी मतभेद विसरून संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे.

कारखान्याने कायम सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर काम केले असून आगामी काळात प्रति एकर १०० टन ऊस उत्पादन करावे लागेल, तरच राज्यात एक नंबर भाव देणे शक्य होणार आहे. विधानसभेत चूक झाली असेल, परंतु आता सहकारी संस्थांबाबत होणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. ॲड. कानवडे, बाबासाहेब ओहोळ यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक सुभाष गुंजाळ यांनी केले. रवी नेहे यांनी आभार मानले.

पाईप कोणाच्या सांगण्यावरून फोडले?

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांनाही त्यांचे पाणी देण्यासाठी तातडीने काम झाले पाहिजे. आम्ही हक्काचे पाणी मागत आहोत. ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाईप टाकले. हे पाईप अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून फोडले असा प्रश्न करताना, मंत्री महोदय असा चुकीचा आदेश देतील असे मला वाटत नाही. मग हे पाईप फोडण्याचे धारिष्ट कुणी केले? प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना १८ तास वीज मिळाली पाहिजे. मात्र आवर्तन चालू असताना पाच ताससुद्धा वीज मिळत नाही. आमदारकीचे कवच नसल्याने हा त्रास सहन करावा लागत अ