महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी परिस्थिती आली आहे की दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. शिवसेना मागच्या वर्षी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या वर्षी. त्यानंतर आता काँग्रेस पक्षही फुटणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनीही काँग्रेसमधले लोकही यायला इच्छुक आहेत असं म्हटलं होतं. तसंच आमदार बच्चू कडू यांनीही हेच वक्तव्य केलं. या सगळ्या चर्चा सध्या होत असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर सूचक उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे सुशीलकुमार शिंदेंनी?

“मला असं मुळीच वाटत नाही की काँग्रेस पक्ष फुटेल. काँग्रेस पक्ष हा विचारांनी पक्का आहे. एकदा काँग्रेस पक्ष फुटला ही वस्तुस्थिती आहे. पण यापुढे असं होईल असं वाटत नाही.” असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं आहे.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य

महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती आत्ता आली आहे ती पाहात बसण्यापेक्षा जास्त आत्ता तरी काही करु शकत नाही. राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांनी नवी प्रथा सुरु झाली आहे. आता पुढे बघायचं काय काय घडतं आहे? असं उत्तर सुशीलकुमार शिंदेंनी दिलं आहे. इतकंच नाही तर निवडणुका जवळ येत आहेत. जनतेला जे काही झालं आहे ते आवडलेलं नाही. त्यामुळे जनताच निवडणुकांच्या वेळी त्यांना धडा शिकवेल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे काही घडलं आहे त्यावर आता काय बोलणार? पुढे काय काय घडतंय बघावं लागेल. कशा तऱ्हेने सरकार चालवलं जातं ते बघू. टिळक स्मारकाच्या पुरस्कारावर मात्र त्यांनी नो कॉमेंट इतकंच उत्तरल दिलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे बंड झालं त्यानंतर मी शरद पवारांना भेटलो नाही असंही शिंदे यांनी सांगितलं आहे.