महावितरणच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान हायटेक पद्धतीने कॉपी करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या सिनेमात अभिनेता संजय दत्त ज्या प्रमाणे कॉपी करताना दाखवला आहे काहीशी त्याच पद्धतीने हे चौघेजण कॉपी करत होते, अशी माहिती समोर आली आहे.  पोलिसांनी या चौघांकडून लॅपटॉप, मोबाईल, कार्ड रिडर जप्त केले आहे. तसेच या चौघांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरण विभागाच्या भरतीची परीक्षा रविवारी होती. जयभवानी नगर भागात ही परीक्षा सुरु होती. या ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी परीक्षा केंद्रात तपासणी केली. तिथे जीवन गिरजाराम जघाळे, निलेश कापूरसिंग जोनवाल, पवन कचरू बहुरे आणि दत्ता कडुबा नलावडे हे चौघेही माईकच्या मदतीने कॉपी करत असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी या चौघांनाही अटक केली. तसेच त्यांच्याकडे असलेला लॅपटॉप, कार्ड रिडर आणि इतर साहित्य जप्त केले. औरंगाबाद परिमंडळ क्रमांक २ चे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four students arrested in aurangabad who were coping in mahavitaran examination
First published on: 12-11-2017 at 21:19 IST