जव्हारपासून सात किमी अंतरावर केळीचा पाडा (काळशेती) येथील धबधब्यावर फिरायला गेलेली पाच तरुण मुलं पाण्यात बुडाली. सेल्फी फोटो काढत असताना आधी 2 मुले पाण्यात पडली. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी इतर मुलांनी पाण्यता उडी मारली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व जण जव्हार येथील अंबिका चौक भागातील रहिवासी आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जव्हार शहरात टाळेबंदी असल्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. जव्हार शहरातील अंबिका चौक येथील १३ मुले काळमांडवी धबधब्यावर दुपारी पोहण्यासाठी गेली होती. हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत असून येथे पावसाळ्यात खाली उतरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठे पाण्याचे डोह आहेत. त्यामुळे या मुलांना खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच मुले बुडाली. त्यानंतर त्यांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व पुढील योग्य त्या कारवाई करीता कुटीर हॉस्पिटल जव्हार येथे आणण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four youths drowned in kalmandavi waterfall at jawahar in palghar districts aau
First published on: 02-07-2020 at 19:33 IST