राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आज ३०० आपला दवाखानांचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याविषयी नागपुरातून बोलताना माहिती दिली. तसंच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा केलेल्या विस्ताराबाबत त्यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्त्वात आणखी एक चांगली योजना सुरू झाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंतचा इलाज मोफत केला आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत मिळत आहेत आणि आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाखांचे उपचार मोफत होत आहेत. यातून जवळपास ९०० ऑपरेशन्स आणि उपचार मोफत मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील १२ कोटींपैकी ८ कोटी लोकांना मोफत उपचार देणार आहोत. किडनी प्रत्यारोपणासाठी चार लाखांपेक्षा जास्त पैसे या योजनेतून देण्यात येतात. सामान्य माणसावर आरोग्याचा बोजा पडू नये याचा विचार आम्ही करत आहेत. या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवत आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

हेही वाचा >> “ट्रिलिअन डॉलर इकोनॉमीपर्यंत…”, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा संकल्प; म्हणाले, “पुरोगामी राज्य म्हणून…”

आपलं दवाखानाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, “अतिशय उत्तम प्रकारची संकल्पना आहे ही. वेगवेगळ्या सेवा मोफत देण्यात येणार आहे. दवाखान्यात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मोफत देण्यात येणार आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम सुरू होतोय, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही करून दाखवलं

“मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला संकल्पना मांडली होती. तानाजी सावंत यांनी ही संकल्पना यशस्वी करण्याचं ठरवलं. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात ही संकल्पना सुरू केली होती. मविआचं सरकार असताना आपलं दवाखानाची घोषणा केली होती, त्यांनी एक रुपयांत दवाखाना उपलब्ध करून देऊ असं म्हटलं होतं. पण अडीच वर्षांत एकही दवाखाना उघड शकले नाहीत. पण तुमच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) नेतृत्त्वात ५०० दवाखाने उघडण्याची घोषणा केली आणि दोनच महिन्यात तानाजी सावंतांच्या नेतृत्त्वाखाली ३०० दवाखाने सुरू होत आहेत. उर्वरित सेवा सुरू होतील. गतिमान सरकार बोलतात ते हेच सरकार आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free treatment will be given to 8 crore people of the state fadnavis informed know what is the exact plan sgk
First published on: 01-05-2023 at 12:14 IST