खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात असलं, तरी यामुळे पक्षाचं काहीही नुकसान झालं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांवर टीकास्र सोडलेलं असताना दुसरे खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर खोचक टीका केली आहे. मला ज्युनिअर म्हणता, मग आत्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली गेलात, ते तर किती ज्युनिअर आहेत? असाही सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच, २०१९ला एनडीए सोबत असताना मिळालेलं मंत्रीपद अरविंद सावंत यांना दिलं गेलं. तेव्हा ज्येष्ठ शिवसेना नेता गजानन किर्तीकर का लक्षात आला नाही? असा सवालही किर्तीकर यांनी केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून आता खुद्द अरकविंद सावंत यांनीच गजानन किर्तीकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“गजानन किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात…”, संजय राऊतांचं टीकास्र; स्वत:चं दिलं उदाहरण!

“सगळं एका क्षणात कसं विसरलात?”

“१९६६चा मी शिवसैनिक आहे. १९६८चा मी गटप्रमुख होतो. चंद्रकांत खैरेंनी निवडणूक लढवली, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रचारात अग्रणी होतो.आम्ही कुठेच आमदार वगैरे नाही झालो. किर्तीकर नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले. लोकाधिकारच्या चळवळीतही सुरुवातीपासून होतो. माझा भाऊ किर्तीकरांसोबत काम करत होता. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की चार वेळा आमदारपद, दोनदा खासदारपद मिळालं. नंतर तुम्ही राज्यमंत्रीही झाला होता. सगळं कसं एका क्षणात विसरलात?” असा सवाल अरविंद सावंत यांनी किर्तीकरांना केला आहे.

“मी एवढ्यासाठीच थांबलो होतो की…”, शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

“शिवसेनेत वरीष्ठ-कनिष्ठ असा वाद कधीच नव्हता. शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश वंदनीय असतो. आता ते ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले आहेत, ते तर किती ज्युनिअर-ज्युनिअर आहेत. मग त्यांचं नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना असं म्हणण्याचा कुठला अधिकार आहे? एक मिंधा दुसऱ्या मिंध्याला मिळाला. आयुष्याचा सूर्य पश्चिमेला मावळत असताना आपल्याला कळायला पाहिजे की मावळताना तरी किमान स्वाभिमानाने जावं. आम्हाला सगळ्यांना वाटतं की भगवा घेऊनच वर जावं”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams pmw
First published on: 12-11-2022 at 13:16 IST