मांढरदेव डोंगरावर दाट झाडीत एका कुमारिकेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे आज सायंकाळी उघडकीस आले. वाई पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
मांढरदेव (ता. वाई ) येथे काळेश्वरी मंदिराजवळ झाडीमध्ये आज सायंकाळी एका मुलीचा मृतदेह आढळला. यानंतर येथे एकच खळबळ उडाली. मंदिर परिसरातील सर्व व्यवहार बंद झाले. वाई पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. दरम्यान, वाई येथून रिक्षातून एक मुलगी व इसम मांढरदेव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ही जोडी लवकर परत न आल्याने हा रिक्षावाला वाईला परत आला. या जोडीपैकीच ही तरुणी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कोणालाही अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आले नाही. ही हत्या आहे की आणखी काय प्रकार आहे हे समजू शकत नाही. आमचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2014 रोजी प्रकाशित
मांढरदेव डोंगरावर मुलीचा खून
मांढरदेव डोंगरावर दाट झाडीत एका कुमारिकेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे आज सायंकाळी उघडकीस आले.

First published on: 21-11-2014 at 04:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl murdered on the mandharadev hill