रत्नागिरी – केमिकल बॅरलची वाहतूक करणारा आयशयर टेम्पो गूगल मॅपचा आधार घेत गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना संगमेश्वर तालुक्यातील फूणगूस येथील एका वळणावर उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला, तर गाडीतील सर्व बॅरल जंगलात घरगळत गेल्याने मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल मॅपच्या मदतीने शॉर्टकट शोधत ४७ बॅरल घेऊन आयशर टेम्पो (क्रमांक जेजी ३७ बी २२६०) चालक योगेश गिरी गोस्वामी हा टेम्पो घेवून गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याच्या गुगल मॅपवर फुणगुस आणि ऊक्षी मार्ग दिसला. मात्र ऊक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे तो जाकादेवी फुणगुस मार्गे संगमेश्वरला निघाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुणगुस येथे सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला. या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅरल जंगलात घरगळत गेले. तसेच आयशर चालकाने गाडीतून उडी मारल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.