Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे निकालाच्या तारखेकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्यांचे गुण तपासू शकतात.

२०२४ मध्ये, दहावीचा निकाल

२०२४ मध्ये, दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला, ज्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१% होती. मुलींनी ९७.२१% गुणांसह मुलांपेक्षा जास्त यश मिळवले होते, तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा दर ९४.५६% होता. या वर्षीच्या कामगिरीच्या ट्रेंडची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा जास्त आहेत.

Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स ( Official Websites to Check Maharashtra SSC Result 2025)

  • mahresult.nic.in
  • mahahsscboard.in
  • results.gov.in
  • digilocker.gov.in

Maharashtra SSC Result 2025: दहावीच्या निकालाची गुणपत्रिका ऑनलाइन कशी डाउनलोड करावी?? (How To Download Maharashtra SSC Result 2025 Online?)

  • स्टेप १: mahresult.nic.in ला भेट द्या
  • स्टेप २: ‘Maharashtra SSC Result 2024’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३: तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
  • स्टेप ४: तुमचा निकाल पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • स्टेप ५: निकालाची गुणपत्रिका डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून घ्या.

DigiLocker वरून दहावीची गुणपत्रिका डाऊनलोड कशी करावी? How to Download SSC Marksheet 2025 On DigiLocker)

  • स्टेप १: digilocker.gov.in वर जा किंवा DigiLocker अॅप उघडा
  • स्टेप २: तुमचा मोबाइल नंबर/आधार आणि पिन वापरून साइन इन करा
  • स्टेप ३: ‘Eductaion’ विभागात जा
  • स्टेप ४: ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)’ निवडा
  • स्टेप ५: ‘SSC Marksheet 2025’ वर क्लिक करा
  • स्टेप ६: तुमची माहिती भरा आणि डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करा

बारावीच्या निकालाबाबत..

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाने ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला, ज्यामध्ये एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८% होती. मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली. यंदा मुलींचा उत्तीर्ण होण्याचा दर ९४.५८% होता, तर मुलांचा उत्तीर्ण होण्याचा दर ८९.५१% होता. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उतीर्ण होण्याचा दर ९७.३५% गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर वाणिज्य (९२.३८%), व्यावसायिक (८३.२६%) आणि कला शाखेचा (८०.५२%) यांचा असा दर होता.

विद्यार्थ्यांना नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून त्यांचे निकाल सहज पाहता येतील.