दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका असा सल्ला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने बीडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच गोपीनाथ गडावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. रक्तदान करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना हा सल्ला दिला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे पंकजा मुंडे?

“दारु प्यायची असेल तर हातभट्टी पिऊ नका. त्याने विषबाधा होते. मी पिण्याला नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणं बंद करा आणि खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसं दिसतं ते? यापुढे तंबाखू-पुड्या खाऊ नका. तसेच चांगलं चांगलं खा. मास-मच्छी, व्हेजिटेरियन खा आणि निरोगी राहा.” असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर होतं. रक्तदान करताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”

गोपीनाथ मुंडेंची जयंती

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबर या दिवशी दरवर्षी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर जमतात. या सर्वांनी यावेळी आपआपल्या गावात आपल्या आवडीप्रमाणे जयंती साजरी करावी. तसंच गोपीनाथ मुंडे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवावं असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी आज केलं.

गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न जनतेसाठी होतं, त्यासाठीच त्यांनी मला तुम्हा सगळ्यांच्या ओटीत टाकले आहे. गोपीनाथ मुंडे १०० वर्षे जगावेत असं तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र गोपीनाथ मुंडे जगू शकले नाहीत. मी प्रभू वैद्यनाथाला अभिषेक केला, बुद्ध विहारात जाऊन प्रार्थना केली. हजरत मलिकशाह दर्गा या ठिकाणी चादरही चढवली आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी प्रार्थना केली. माझे बाबा (गोपीनाथ मुंडे) आज आपल्यात नसले तरीही त्यांचे विचार आणि संस्कार आजही आपल्यात आहेत. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.