भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश कराडच्या मुख्य बाजारपेठेने मुंडे यांच्या जयघोषात कृष्णाघाटावर आणून येथे कृष्णा कोयनेच्या अपूर्व प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर असलेल्या स्नेहबंधाचा उल्लेख करीत मुंडेंच्या निधनाने केवळ भाजपचीच नव्हेतर अवघ्या महाराष्ट्राची हानी झाल्याची भावना व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी मुंडेसाहेबांच्या जाण्याने पक्षाचा खरा आधारवड हरपला असून, त्यांचे कार्य अविरत सुरू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना व्यक्त केली.
अस्थिकलश यात्रेत ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, घनश्याम पेंढारकर, नीतिश देशपांडे, नितीन वास्के, सुवर्णाताई पाटील, केदार डोईफोडे, विष्णू पाटसकर, गणेश कापसे आदी भाजप कार्यकर्त्यांसह शिवसेना, रिपाइं, शेतकरी संघटना, हिंदू एकता, शिवप्रतिष्ठान, कराड जिमखाना, जनकल्याण पतसंस्था, यशवंत बँक आदी सेवाभावी संस्था, पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थींचे प्रीतिसंगमात विसर्जन
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश कराडच्या मुख्य बाजारपेठेने मुंडे यांच्या जयघोषात कृष्णाघाटावर आणून येथे कृष्णा कोयनेच्या अपूर्व प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
First published on: 17-06-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath mundes ashes immersed in pritisangam at karad