पुण्यातील निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल शशिकांत दळवी हे गेली १८ वर्षे जलसंधारणासाठी काम करत आहेत. २००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन वॅाटर हार्वेस्टिंग’ या आपल्या प्रकल्पांतर्गत त्यांनी विमान नगर येथील स्वतः राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेपासून याची सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे सोसायटी टँकर मुक्त होण्यास मदत झाली. ज्यामुळे पैशाची बचत झाली शिवाय विमान नगरमधील पाण्याची पातळीही सुधारली. सोसायटीमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ‘पर्जन्य’ ही संस्था स्थापन केली. संस्थेद्वारे त्यांनी पाण्याबाबत जनजागृतीची मोहिमही हाती घेतली.

सात राज्य, महाराष्ट्रातील सहा जिल्हे आणि मराठवाड्यातील १३० गावं तसंच गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, उद्योग यासारख्या जवळपास ६५०हून अधिक ठिकाणी या प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. २०१७च्या सुमारास दळवी यांनी Climate Reality Project India या संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम सुरू केलं. आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडच्या अंतर्गत १०० टक्के आर्थिक सहकार्याने बीड जिल्ह्यातील सुमारे १०० गावांची निवड प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. जलसंधारणाच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरीसाठी दळवी यांना २०२३च्या ‘जलप्रहरी’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi retired colonel shashikant dalvi has been implementing rooftop rain water harvesting project in pune maharashtra and various parts of india mission save water pck
First published on: 11-04-2024 at 13:02 IST