राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यात येणार आहे. यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णया जारी करण्यात आला. यानुसार येत्या १३ जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्याबाबत निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन चौथ्या सोमवारी (२७ जून २०२२) विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाचे नेमके कोणते निर्देश?

१३ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रबोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत २४ ते २५ जून २०२२ रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येईल. २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 11th Admission: अकरावीचे प्रवेश अर्जांसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी; ‘या’ सहा शहरांत सुरु होणार प्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आणि यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-१९ प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.