अहिल्यानगर:जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या गटनिहाय आरक्षणाची सोडतीने दिग्गजांना धक्का दिला, अनेक इच्छुकांचा निवडणूक लढण्याचा पत्ता कट झाला आहे तर काहींचा निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काहींना आपल्या कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरवावे लागणार आहे. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल.

माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, राजश्री घुले व मंजुषा गुंड, माजी सदस्य राजेश परजणे, सभापती क्षितिज घुले व माजी सभापती अर्जून शिरसाठ यांचे मार्ग मोकळे झाले. माजी सभापती सुनिल गडाख, कैलास वाघचौरे, संदेश कार्ले, हर्षदा काकडे यांना पर्यायी गट शोधावी लागणार आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. या पदासाठी चार महिला गट आजच्या आरक्षणात निश्चित झाले. त्यात अकोल्यातील सातेवाडी व देवठाण तर संगमनेरमध्ये बोटा व राहूरीत बारागावनांदूर हे चार गट अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या चार गटातून ठरला जाणार आहे.

अकोलेमध्ये पाच, श्रीरामपूर तीन, राहाता तीन, अहिल्यानगरमध्ये दोन गट राखीव झाल्याने या गटात सर्वसाधारण प्रवर्गसाठी गट राहिले नसल्याचे दिसते तर पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यात सर्वसाधारण गटांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी जोरदार लढती होण्याची शक्यता आहे.

गटनिहाय आरक्षण:अकोले- समशेरपुर- अनुसूचित जमाती, देवठाण- अनुसूचित जमाती (महिला). धामणगाव आवारी – सर्वसाधारण (महिला), राजूर – अनुसूचित जमाती. सातेवाडी – अनुसूचित जमाती (महिला). कोतूळ – अनुसूचित जमाती. संगमनेर- समनापुर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). तळेगाव- सर्वसाधारण (महिला). आश्वी बुद्रूक – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). जोर्वे – नागरिकांचा मागास प्रवर्ग. घुलेवाडी – सर्वसाधारण. धांदरफळ बुद्रूक – सर्वसाधारण. चंदनापुरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग. बोटा – अनुसूचित जमाती (महिला). साकूर – सर्वसाधारण.

कोपरगाव- सुरेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). ब्राम्हणगाव – सर्वसाधारण. संवत्सर – सर्वसाधारण. शिंगणापुर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). पोहेगाव बुद्रुक सर्वसाधारण (महिला). राहाता- पुणतांबा – अनुसूचित जाती. वाकडी – अनुसूचित जाती. साकुरी – अनुसूचित जाती (महिला). लोणी खुर्द- नागरिकांचा मागास प्रवर्ग. कोल्हार बुद्रुक – सर्वसाधारण (महिला)

श्रीरामपूर- उंदिरगाव – अनुसूचित जाती (महिला). टाकळीभान- सर्वसाधारण (महिला). दत्तनगर – अनुसूचित जाती. बेलापूर- अनुसूचित जाती (महिला).

नेवासा-बेलपिंपळगाव – सर्वसाधारण (महिला). कुकाणा – सर्वसाधारण (महिला). भेंडा बुद्रुक – सर्वसाधारण. भानसहिवरे – सर्वसाधारण. खरवंडी – सर्वसाधारण (महिला). सोनई – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). चांदा – सर्वसाधारण (महिला). शेवगाव-दहिगाव ने – सर्वसाधारण. बोधेगाव – सर्वसाधारण. भातकुडगाव – अनुसूचित जाती (महिला). लाडजळगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).

पाथर्डी- कासार पिंपळगाव- सर्वसाधारण. भालगाव – सर्वसाधारण. तिसगाव – सर्वसाधारण. मिरी – सर्वसाधारण (महिला). टाकळीमानूर – सर्वसाधारण (महिला)

अहिल्यानगर- नवनागपुर – सर्वसाधारण (महिला). जेऊर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). नागरदेवळे – अनुसूचित जाती (महिला). दरेवाडी – अनुसूचित जाती. निंबळक – नागरिकांचा मागास प्रवर्ग. वाळकी – नागरिकांचा मागास प्रवर्ग. राहुरी- टाकळी मिया – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला). ब्राम्हणी – सर्वसाधारण. गृहा- सर्वसाधारण. बारागाव नांदूर- अनुसूचित जमाती (महिला). वांबोरी- सर्वसाधारण (महिला). टाकळीढोकेश्वर- सर्वसाधारण (महिला). ढवळपूरी- सर्वसाधारण (महिला). जवळा- नागरिकांचा मागास प्रवर्ग. निघोज- नागरिकांचा मागास प्रवर्ग. सुपा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

श्रीगोंदा-येळपणे – सर्वसाधारण. कोळगाव- सर्वसाधारण. मांडवगण- सर्वसाधारण (महिला). आढळगाव – सर्वसाधारण (महिला). बेलवंडी- सर्वसाधारण. काष्टी – नागरिकांचा मागास प्रवर्ग. कर्जत- मिरजगाव- सर्वसाधारण. चापडगाव – सर्वसाधारण (महिला). कुळधरण – नागरिकांचा मागास प्रवर्ग. कोरेगाव- सर्वसाधारण (महिला). राशिन- नागरिकांचा मागास प्रवर्ग जामखेड- साकत – सर्वसाधारण. खर्डा – सर्वसाधारण. जवळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)