कोल्हापूर : काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कोल्हापूर महापालिका हद्दवाढ कृती समितीशी दुपारी एक वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी २०२१ मध्ये हद्दवाढीचा नविन प्रस्ताव मागविला. तो शासनाकडे पाठवला गेला. त्यानंतर मोहीते हेलीपॅड व जयसिंगपुर हेलीपॅड येथे कृती समितीने शिंदे यांची भेट घेऊन पाठपुरावा केल.पण पुढे काही ही नाही.
सत्ताबदल, नवीन पालक मंत्री यात काही महिने सरले. जिल्हाधिकारी यांच्या बरोबर पत्रव्यवहार केला. हद्दवाढ विषयी पालकमंत्री यांच्यासमवेत करण्याची मागणी केली. काल निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेलो पण भेट झाली नाही. त्यामुळे पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असा इशारा दिला. त्यावर यंत्रणा कार्यरत झाली असून पालकमंत्री शनिवारी दुपारी हद्दवाढ विषयी ,जिल्हाधिकारी कार्यालयात कृती समिती भेटणार असल्याचे शुक्रवारी निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.