विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते अजित पवार भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. शिवेसना (शिंदे गट) आमदार आणि नेते सातत्याने यावर प्रतिक्रिया देत आहेत. भाजपा नेतेही या अफवांना दुजोरा देत असताना आज कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाचा जोरदार पाऊस पडेल असं चित्र निर्माण झालं आहे. तुम्ही त्यांच्या आमदारांची वक्तव्ये पाहा जरा. आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले आम्ही अजितदादांच्या मागे आहोत. आमदार अण्णा बनसोडे काय म्हणाले ते पाहा. हे कशाचं द्योतक आहे? आमदार असं का बोलत आहेत? मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला नाही वाटत अजितदादा आता तिथे थांबतील.

हे ही वाचा >> अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर अखेर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ही चर्चा…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीही असंच वक्तव्य केलं होतं. पाटील म्हणाले होते की, “बरेच आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण बघुयात, कारण कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. आणि ती तिथी येतेय. पण असं असलं तरी अजून कुळ बघावं लागेल, गुण जुळावे लागतील. मग ते काम करावं लागेल”