मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाद सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असा आरोप आमदार राणा यांनी केला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांना एक तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावे, असा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, या वादात आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतली आहे. रवी राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

हेही वाचा – ‘त्या’ तडजोडीचे दुष्परिणाम भोगले, बच्चू कडू यांचे विधान; आमदारांच्या गटबाजीवरुन प्रश्न विचारताच म्हणाले, “खोकेवाले आमदार…”

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“आमदारांना समज घालण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आहे. मुळाच एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. कोणीही बिकाऊ नाही, याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वचाा – किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर आक्रमक, म्हणाल्या “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अशा आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे. तसेच दोघांना शांततेत बसवून चर्चा करावी”, असेही ते म्हणाले.