राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. काल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतही एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते,’ हे ते म्हणाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र राज्यापालांच्या विधानाचे समर्थन केलं आहे. काही पराभूत मनोवृत्तींचे लोकं राज्यापालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – विश्लेषण: ठाण्यातील राजकीय समन्वयाचे पर्व इतिहासजमा झालंय? वारंवार संघर्ष का निर्माण होतोय?

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“राज्यपालांच्या वक्तव्याचा काही पराभूत मनोवृत्तीचे लोकं चुकीचा अर्थ काढत आहेत. ते पराभूत मनोवृत्तीचे लोकं आहेत, त्यांची नावे घेण्याची गरज नाही. या लोकांनी त्यांचे भाषण व्यवस्थितपणे ऐकावं. त्यांचं भाषण हे तात्वीक आहे ” . अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

हेही वाचा – राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “शिवसेना फोडली, इथे…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

“शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आज नितीन गडकरींसारखे अनेक नेते काम करतात. त्यामुळे शिवरायांचा आदर्श ठेऊन त्या पद्धतीने काम करा, असं म्हणणं कोणताही गुन्हा नाही. असा आक्षेप घेणारे पराभूत मानसिकतेतून अशी टीका करतात. राजकीय भूक भागवण्यसाठी त्यांच्याकडून टीका केली जात आहे” , असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. “तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे ते म्हणाले.