राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. रामदास आठवले म्हणाले, “नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रेही पाहिली आहेत.”

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार आठवले म्हणाले की, नवाब मलिक हे आरोप लावत आहेत कारण त्यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात होता. समीर वानखेडे हा दलित आहे. जर आर्यनने अंमली पदार्थांचे सेवन केले नसते आणि त्याच्यावर कोणताही खटला नसता, तर न्यायालयाने त्याला इतके दिवस जामीन का दिला नव्हता?

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आठवले यांना भेटायला गेले होते. “त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे मला त्यांची बाजू घेऊन त्यांना पाठिंबा देण्याची गरज होती,” असं रामदास आठवले म्हणाले. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या, “रामदास आठवले आम्हाला पाठिंबा देत आहे कारण आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे दाखवली आहेत. ते आमच्या राज्यासाठी सहानुभूतीशील आहेत. नवाब मलिक यांनी केलेले सर्व दावे खोटे सिद्ध झाले आहेत.”