विदर्भ आणि मराठवाडय़ावर रुसलेल्या पावसाने मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. आतापर्यंत या ठिकाणच्या चार जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्राप्रमाणे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली. मात्र मध्य महाराष्ट्रात अनेकदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एकीकडे इतर जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा तीस ते चाळीस टक्के पाऊस कमी झालेला असतानाच नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर येथील सरासरी मात्र १४० टक्क्यांहून जास्त झाली. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपण्याचे ठरवले आहे. गुरुवारपासून राज्याच्या दक्षिणेला ढगांचा मोठा पट्टा आल्याने उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्य़ांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारीही यामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला. शनिवारी व रविवारीही मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall again in central maharashtra
First published on: 09-09-2017 at 05:17 IST