राज्यभरात बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

पावसाचा तडाखा ; मुंबई, ठाण्यात वाहतूक मंदावली, नोकरदारांचे हाल; गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीसंदर्भात माहिती जाणून घेतली. ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.

एक मगर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात धावताना दिसली, जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी मुंबई, ठाण्यालाही पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळे या भागातील रस्ते वाहतूक मंदावली आणि कामावरुन घरी परणाऱ्यांचे मोठे हाल झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पातलीपाडा, खारेगाव आणि कोपरी या तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला.